+91-22-20820770

समृद्ध महाराष्ट्र

महाराष्ट्र हे देशातील एक प्रगत राज्य आहे, कायमस्वरूपी देशाच्या अर्थव्यवस्थेस व लोककल्याणाच्या कामामध्ये अग्रणीस्थानावर असते. जागतिकदृष्ट्याही महाराष्ट्र राज्याकडे भरभराटीचे राज्य व विविध क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणारे राज्य म्हणून पहिले जाते.

महाराष्ट्र या शब्दाचा शब्दशः अर्थ हा 'महान राष्ट्र' असा आहे . महाराष्ट्र देशातील आर्थिकदृष्टया समृद्ध असे राष्ट्र असून देशाच्या सकल उत्पन्नात व औदयोगिक उत्पादन साधारणतः एक चतुर्थांश हिस्साइतपत योगदान देते.

राष्ट्र बांधणीसाठी

महाराष्ट्र राज्य हे एक प्रगतशील राज्य आहे. राज्याने औद्योगिक व सेवा क्षेत्रामध्ये खूप आर्थिक प्रगती केली. परंतु मागील काही वर्षामध्ये राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे व कृषी क्षेत्रातील उत्पादनांमध्ये अनियमितता आल्यामुळे ग्रामीण भागातील राहणीमान तणावाखाली आहे. राज्य शासनाने ग्रामीण भागातील दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था व समाजसेवी व्यक्ती यांच्या सहाय्याने युद्ध पातळीवर विविध प्रकारची कामे हाती घेतली आहेत. या व्यतिरिक्त सामाजिकदृष्ट्या मागास खेड्यांचा विकास करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

जलयुक्त अभियानाच्या यशातून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठानाचे बीजारोपण झाले. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान हे एक सार्वजनिक, खाजगी, सेवाभावी संस्था व भारतातील अग्रणी खाजगी कंपनी यांच्या भागीदारीतून राष्ट्र बांधणीत विकासाचा मार्ग सुकर करून ग्रामीण महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

शाश्वत विकास ध्येयांसाठी

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान, ग्रामीण भागात विविध विकास ध्येयावर काम करून सर्वांगीण सामाजिक परिवर्तन घडवून आणणे यामध्ये प्रामुख्याने डिजिटल कनेक्टिव्हिटी, सर्वांसाठी पक्की घरे, पाण्याची सुरक्षितता, कौशल्य विकास, पर्यावरण संवर्धन, कृषी उत्पादकतेत वाढ, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य व स्वच्छतेसाठीच्या सुविधा निर्माण करणे.

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामार्फत गावे सक्षम करणे व विकास कामे, बदल स्वयंस्पुर्त व शास्वतपणे घडविणे हा आहे. हे अभियान एकजिनसी व भागीदारी, सहकार्याच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक ग्रामीण परिवर्तन घडवून आणण्याचे एक उत्तम साधन बनेल. तसेच भविष्यात हे माँडेल प्रतिकृती स्वरूपात सर्वत्र अमलात आणले जाऊ शकते.

तरुण भारत: नव भारताची बांधणी

मा. मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रमातून उच्च शिक्षित परिवर्तक निवडलेल्या ग्राम पंचायतीमध्ये नियुक्त करून गावांमध्ये शाश्वत बदल घडविणे अत्यंत महत्वाचे आहे.

परिवर्तक हे अतिशय स्पर्धात्मक प्रक्रियेतून निवडले जातात. ग्राम परिवर्तक नेमलेल्या गावांमध्ये लोकसहभागातून सर्वांगीण गाव विकास आराखडा व प्रभावी अंमलबजावणीसाठी उत्प्रेरकची भूमिका पार पाडतात.

प्रतिष्ठानांबाबत

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन हे कंपनी अधिनियमाच्या कलम - ८ नुसार स्थापन करण्यात आली आहे.

नेतृत्वाचे मार्गदर्शन

श्री. देवेंद्र फडणवीस, मा. मुख्यमंत्री यांचे ग्राम परिवर्तकांना मार्गदर्शन दि. २ एप्रिल २०१७