+91-22-20820770

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (एम-व्हीएसटीएफ) आपल्या संस्थापक नियमावलीमार्फत अभियान व्यवस्थापन, सनियंत्रण व मूल्यमापनासाठी खालील परिषदेची स्थापना केली आहे.

नियामक मंडळ

  • राज्यात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी व सहाय्य करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ व सामाजिक संस्थांचा सहभाग असलेले नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. मुख्यमंत्री असतील.
  • नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. मुख्यमंत्री नियामक मंडळावर तज्ञ व्यक्तीला “विशेष निमंत्रित” म्हणून नियुक्त करु शकतील. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या प्रगतीसाठी उच्च दर्जाची माहिती/ज्ञान/साधनसामग्री नियामक मंडळ ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानास उपलब्ध करुन देईल.

कार्यकारी मंडळ

  • कार्यकारी मंडळामध्ये मा. मुख्यमंत्री यांनी नामनिर्देशित केलेले मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी, मा. मंत्री (ग्राम विकास) यांनी नामनिर्देशित केलेले ग्राम विकास विभागातील अधिकारी तसेच ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामध्ये सहभागी झालेल्या सर्व कॉर्पोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल.
  • कार्यकारी मंडळाचे सदस्य नियामक मंडळाला बांधील असतील आणि ग्रामीण सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या दैनंदिन कामकाजाला जबाबदार असतील.

कार्यगट

  • कार्यगटामध्ये संबंधित क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा (Domain experts) समावेश असेल. कार्यगट कंपनीच्या कामाच्या पद्धती निश्चित करतील तसेच ते कार्यकारी मंडळाला बांधील असतील. नियामक मंडळाच्या विकासाधिष्ठित कार्यांसाठी पायाभूत ठरणारी सुस्पष्ट, अचूक/सुनिश्चित आणि रचनात्मक दर्जेदार कार्यपद्धती तयार करण्याची जबाबदारी त्यांची असेल. कार्यगटांचे संनियंत्रण नियामक मंडळ व कार्यकारी मंडळाने निश्चित केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येईल.

जिल्हा अभियान परिषद

  • ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत निवडलेल्या ग्राम पंचायतींमध्ये विकासाचे काम परिणामकारकरीत्या आणि सुरळीतपणे चालू असल्याची खात्री करुन घेण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अभियान परिषद (DMC) गठीत करण्यात येईल.